मी दिव्यांग मंत्रालयात आयुक्त आहे तुमच्या मुलाला नोकरी लावतो असे म्हणून पंधरा लाख रुपयाची फसवणूक…

मी दिव्यांग मंत्रालयात आयुक्त आहे तुमच्या मुलाला नोकरी लावतो असे म्हणून पंधरा लाख रुपयाची फसवणूक…
सांगोला (तालुका प्रतिनिधी) मी महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग मंत्रालयात आयुक्त या पदावर नोकरीला आहे. आमचे मंत्री कोट्यातून तुमचे मुलाना नोकरी लावतो त्याकरीता तुम्हाला पैसे दयावे लागतील असे म्हणून ओळखीतील नातेवाईकाने १९ लाख ५० हजार रुपये येऊन फसवणूक केल्या प्रकरणी विराज शामराव बर्वे रा. जवळा ता. सांगोला यांनी नातेवाईक विजय दामोदर म्हस्के रा. नातेपुते ता. माळशिरस यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बिरा शामराव बर्वे रा.जवळा ता.सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शेती करून कुटुंबाची उपजीविका करतात त्यांच्या घरातील मुलगा मोठा झाल्याने ते सन २०२२ पासुन मुलास नोकरी लावण्याकरता प्रयत्नशील होते विजय म्हस्के हा फिर्यादीचा नातेवाइक असल्याने फिर्यादीची विजय मस्के यांची ओळख होती , विजय मस्के याने मी महाराष्ट्र राज्य दिव्यांग मंत्रालयात आयुक्त या पदावर कामावर आहे मी आमचे खात्यातील मंत्री कोट्यातुन तुमचे मुलाना नोकरी लावतो त्याकरीता तुम्हाला पैसे दयावे लागतील असे सांगितल्यावर फिर्यादी बर्वे यांनी मस्के याचेवर विश्वास ठेवला त्यावेळी मस्के याने फिर्यादीला तुमच्या दोन्ही मुलांना मी नोकरी लावतो असे सांगीतले त्यासाठी तुम्हाला २४ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले
व विश्वास ठेवुन बर्वे यांनी मस्के याला दि.१७ जून ते १२ जुलै २३ या दरम्यान एकूण १९ लाख ५० हजार रुपये वेळोवेळी दिले आहेत दरम्यानचे काळात मस्के याने त्याचे ओळखपत्राची छायांकीत प्रत दिली होती तसेच माझे दोन्ही मुलाचे फॉर्म भरून घेतलेले हेाते तसेच दि. १८ जुलै २३ रोजी महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, मंत्री कोटा असे म्हणून मुलगा सुरज वीरा बर्वे या नावाचे अपॉइंटमेंट लेटर ही दाखविले होते, त्यानंतर m सदर पत्र दाखविल्यापासुन आज पावेतो नोकरीवर कधी रूजु करून घेणार म्हणुन फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटुन विचारणा केली परतु तो टाळाटाळ करू लागला
व फिर्यादीचे फोन उचलने बंद केले त्यानंतर फिर्यादीने त्याला माझे दिलेले पैसे परत दे असे म्हणाले तेव्हा मस्के यांनी फिर्यादीला दिलेल्या पैशांपैकी २०२४/२५ दरम्यान ४ लाख ५० हजार रुपये परत केले आहेत, उर्वरित पंधरा लाख रुपये विजय मस्के याचे कडून येणे आहे याबाबत बिरा बर्वे यांनी विजय मस्के यांच्याविरुद्ध नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले आहेत ते परत न दिल्याने त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.