एखतपूरचे सुपुत्र सुबेदार जालिंदर मोरे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

एखतपूरचे सुपुत्र सुबेदार जालिंदर मोरे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
सांगोला प्रतिनिधी :
एखतपूर गावचे सुपुत्र सुबेदार जालिंदर मारुती मोरे यांनी भारतीय सैन्यदलातील आर्मी सिग्नल कोरमध्ये 28 वर्षे अविरत सेवा करून मायभूमीत परतल्यावर, त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्था सांगोला यांच्या वतीने सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व माजी सैनिक, गावकरी व मान्यवर उपस्थित होते.
सुबेदार जालिंदर मोरे व त्यांच्या अर्धांगिनी सौ. ज्योत्स्ना मोरे यांना गावकऱ्यांसह माजी सैनिकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत (DS), युवा नेते गुंडादादा खटकाळे, मा. अतुल पवार, युवा नेते यशराज साळुंखे पाटील यांनी मोरे दाम्पत्याचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील होते. उपाध्यक्ष सुबेदार मेजर रविकांत गणपत मराळ, अकोला संघटनेचे सचिव गणेश चौगुले, कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दत्तात्रय केदार, सोनंद संघटनेचे सुबेदार मेजर ठोकळे यांसह विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मोरे साहेबांच्या देशसेवेचे कौतुक केले.
याप्रसंगी आजी-माजी सैनिक संघटना चिणकेचे अध्यक्ष सुबेदार बाळासाहेब पाटील व त्यांचे पदाधिकारी, अकोला संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब लिगाडे, मानेगाव संघटनेचे अध्यक्ष सुबेदार उत्तमराव बाबर, सोनंद संघटनेचे अध्यक्ष सुबेदार मेजर रामचंद्र काशीद व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे कॅप्टन हनुमंत माने, सुभेदार बाळासाहेब कोकरे, अविनाश पवार, कॅप्टन धनाजी पवार, भाऊसाहेब बाबर, संजय गुंगे, मोहन पाटील, सुखदेव सपताळ, दीनानाथ काकेकर, तानाजी बुरंगे, रघुनाथ केदार, विलास सावंत, तानाजी जाधव (मंगळवेढा), महादेव कदम (खर्डी), रमेश विटेकर, कॅप्टन लवटे, सुभाष सावंत, भारत मोरे, सूर्यवंशी, मारुती चव्हाण, पांडुरंग शिंदे, सुबेदार दादा सूर्यवंशी, कुंडलिक पाटील, बाबूलाल मुल्ल, सुबेदार लवटे आणि नवी मुंबईहून आलेले पीएसआय मोरे यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली.
एखतपूर गावातील ग्रामस्थ व मोरे परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी व उपस्थित माजी सैनिकांनी मोरे परिवारास भरभरून शुभेच्छा दिल्या. मोरे परिवारातर्फे सर्व आजी-माजी सैनिक व आलेल्या मान्यवरांना स्नेहभोजन देण्यात आले.
जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र!