महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयास मान्यवर साहित्यिकांची सदिच्छा भेट

महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयास मान्यवर साहित्यिकांची सदिच्छा भेट
उदनवाडी वार्ताहर:
उदनवाडी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयास रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा सोलापूरच्या अध्यक्षा प्रा.डॉ.श्रुती श्री.वडगबाळकर ,ज्येष्ठ साहित्यिक गोविंद काळे आणि अक्कलकोट येथील लेखिका आरती काळे, अनिकेत कुलकर्णी यांनी ग्रंथालयाला सदिच्छा भेट देऊन वाचनालय करीत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. पुढील दमदार वाटचालीस त्यांनी शुभेच्छाही दिल्या.या भेटीमध्ये त्यांनी ग्रंथालयाची पाहणी केली व सर्व साहित्यिकांनी त्यांनी स्वत: लिहिलेले ग्रंथ ग्रंथालयाला भेट म्हणून दिले. त्याचा स्वीकार ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी प्राचार्य विठ्ठल हणमंत वलेकर व सचिव सौ. चिंगूताई वलेकर यांनी केला.यावेळी ग्रंथालयाच्या वतीने या तिन्ही साहित्यिकांचा सत्कार ग्रंथ, वाचनालयाची ज्ञानप्रभा स्मरणिका, पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कवी प्रा. मुकुंद वलेकर, हरी वलेकर सर, योगेश वलेकर, रंगनाथ वाघमारे, यांच्यासह अनेक ग्रामस्थ व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथालयाचे ग्रंथपाल विजय वलेकर, रोहित गेजगे व सेवक लक्ष्मी टिंगरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.