कडलास येथे महादेव मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन राजश्री ताई नागणे यांच्या हस्ते संपन्न

कडलास येथे महादेव मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन राजश्री ताई नागणे यांच्या हस्ते संपन्न
सांगोला प्रतिनिधी
कडलास गावातील महादेव मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री ताई नागणे पाटील यांच्या हस्ते संपन्न. सभामंडपाचे बांधकामांसाठी महाराष्ट्र शासनाकडून 25 लाख रुपया निधी मंजूर करण्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री ताई नागणे पाटील व भाजप महाराष्ट्र किसान सेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव गायकवाड यांनी पाठपुरावा केला व निधी मंजूर करून घेतला . महादेव मंदिरात पूजा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते बाबूरावजी गायकवाड, शेतकरी सुतगिरणी व्हा चेअरमन नितीन गव्हाणे, नवनाथ पवार, सरपंच दिगंबर भजनावळे, उपसरपंच सुमन अनुसे , सुनील पाटील , समाधान पवार , विजय बाबर, आनंदराव पाटील, शामराव गायकवाड, नारायण पाटील, जयंत केदार,समाधान सरगर , नारायण वाघमोडे, निलेश माने , शिवाजी ठोकळे, कडलास ग्रामपंचायत आज माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते