न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज सांगोला मध्ये मंगळवारपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रारंभ

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज सांगोला मध्ये मंगळवारपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रारंभ
सांगोला प्रतिनिधी :
मंगळवार दिनांक 11/02/25 ते सोमवार दिनांक 17/03/ 25 कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि. कॉलेज सांगोला मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च 2025 सुरु होत आहे. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे उपप्राचार्य प्रा संतोष जाधव हे काम पाहणार आहेत.
या परीक्षा केंद्रावर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला, सांगोला विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज,सांगोला, नाझरा विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज नाझरा , कै स.शा. लिगाडे विद्यालय व कै. जगन्नाथराव लिगाडे ज्युनि. कॉलेज अकोला या ज्युनियर कॉलेजचे नियमित, श्रेणी सुधार, खाजगी, तुरळक विषय असणारे व पुनर्परीक्षार्थी असे एकूण 1069 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत.
इयत्ता बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रातील असणाऱ्या पेपरसाठी सकाळी दहा वाजता व दुपार सत्रातील पेपर साठी दुपारी दोन वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या पालकांना व इतरांना परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेसाठी आवश्यक लेखन साहित्य, ओळखपत्र, परीक्षा प्रवेश पत्र व पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घेऊन यावी, याशिवाय इतर कोणतेही अनावश्यक साहित्य, पेपर लिहिण्यासाठी असणारे पॅड, मोबाईल, स्मार्ट वॉच, बॅग इत्यादी वस्तू आवारात आणू नये, असे आवाहन केंद्र संचालक उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव यांनी केले आहे.