वाकी शिवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दिपक होवाळ यांची बिनविरोध निवड.

सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुका सचिव पॅंथर दिपक होवाळ यांची सोमवार दिनांक 27/ जानेवारी 2025 रोजी 11 वाजता ग्रामसभेमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे नूतन अध्यक्ष दिपक होवाळ यांचा फेटा, शाल, व पुष्पहार घालून मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सांगोला तालुक्याचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, सरपंच अनिल हंबीरराव, ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार ताटे, माजी पोलीस पाटील साहेबराव पाटील, नरळेवाडी चे पोलीस पाटील नानासाहेब वाळखिंडे, माजी चेअरमन शिवाजी साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जाधव, तुकाराम मोहिते, विकास सेवा सोसायटीचे सदस्य अमोल पाटील, नानासाहेब रोकडे, ऋषिकेश पाटील, वसंत ढेंबरे, शंकर गेजगे, समाधान होवाळ,
मारुती बुचडे, संभाजी गोतसूर्य, अतुल गवळी, संजय चव्हाण, सुरेश होवाळ, पप्पू सोहनी, शकील सावंत, सर्जेराव उबाळे, प्रकाश होवाळ, सचिन गोतसूर्य, भिकाजी बुचडे, बंटी होवाळ, निलेश होवाळ, समाधान गायकवाड व ग्रामपंचायत कर्मचारी सारिका पलसे, अनिल चव्हाण, हरिदास पवार इत्यादी उपस्थित होते.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदासाठी एकूण सात जण इच्छुक होते त्यापैकी सहा जणांनी माघार घेऊन दिपक होवाळ यांना पाठिंबा देऊन त्यांना काम करण्याची संधी दिली. दिपक होवाळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.