वाढेगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

वाढेगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
वाढेगांव – वाढेगांव ता. सांगोला येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी रविवारी दि. ३० मार्च पासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सलग ७ दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्यात दररोज पहाटे ५ ते ६.३० वा. काकडा आरती, सकाळी ७.३० ते ११ वा. ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ३ गाथा भजन, सायंकाळी ४.३० ते ६ वा. हरिपाठ तसेच सायंकाळी ६.३० ते ९ वा. ह. भ. प. भगवताचार्य विवेकानंद महाराज शास्त्री यांचे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ होणार असून त्यानंतर हरिजागर असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व व मार्गदर्शन ह. भ. प. शिवाजी महाराज साळुंखे व ह. भ. प. डॉ. विजयकुमार जाधव सर यांचे लाभणार आहे. तसेच दररोज रात्री ९ ते १० या वेळेत सर्व भविकासाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ४ रोजी सायंकाळी ४ वा. दिंडीसोहळा आयोजित केला आहे. दि. ५ एप्रिल रोजी सकाळी १० वा. काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने या पारायण सोहळ्याची सांगता होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.