सांगोला

महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी युवक नेते गणेश कांबळे यांची निवड 

महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी युवक नेते गणेश कांबळे यांची निवड

 

सांगोला / प्रतिनिधी :

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे कट्टर समर्थक व जवळा जिल्हा परिषद गटाचे युवक नेते गणेश कांबळे यांची महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाच्या राज्य व जिल्हा कार्यकारणीच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यामध्ये जवळा जिल्हा परिषद गटाचे युवक नेते गणेश कांबळे यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. गोशाळा व गोशाळा चालक प्रशासनातील कामाची दखल घेवून सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. आपल्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील तमाम गोशाळा चालकांच्या विविध समस्या, अडचणी आपण शासन दरबारी मांडून त्यांना आपल्या माध्यमातून न्याय द्याल, गोशाळा चालकांचे भक्कम संघटन उभे राहील अशी आशा बाळगतो. अशा शुभेच्छा निवडी दरम्यान संस्थापक अध्यक्ष म.रा. लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघ यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

सदर निवडीमुळे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश कांबळे यांच्यावर सांगोला शहर व तालुक्यातील नेते मंडळी, विविध राजकीय सामाजिक पक्षाकडून व विविध संघटना, व्यापारी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button