शैक्षणिक

अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे महिलादिन उत्साहात साजरा

अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे महिलादिन उत्साहात साजरा

 सांगोला प्रतिनिधी :

अभिनव पब्लिक स्कूल, येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पालक महिलांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजनाळे गावच्या सरपंच अनिता पवार या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सुजाता देशमुख, छाया कोळवले पोलीस, वंदना शिंदे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी महिलांच्या हक्क, जबाबदाऱ्या आणि समाजातील भूमिकेवर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सुरेखा मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांनी कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात यावर विचार मांडले.यावेळी उपस्थित पालक महिलांनी ही आपले अनुभव आणि विचार मांडून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा, तळ्यात-मळ्यात आणि कपाचे मनोरे बनवणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्या महिला पाककला स्पर्धा :प्राजक्ता नंदकुमार चौगुले- प्रथम, अनिता अमोल चौगुले- द्वितीय, कविता राजू येलपले- द्वितीय, शितल संदीप कोळवले- तृतीय, पूजा श्रीकांत कुल्लोळी- तृतीय तसेच सपना हरीश लाडे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.तळ्यात-मळ्यात स्पर्धा :विद्या वैभव विभुते- प्रथम, मनीषा विजय लोकरे-द्वितीय,शकुंतला चंद्रकांत लाडे-तृतीय.कपाचे मनोरे बनवणे स्पर्धा:अनिता सुनील येलपले यांनी विजयी होण्याचा मान पटकावला. या कार्यक्रमात विजेत्या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी आपल्या प्रभावी शैलीत केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button