म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत लवकरच पाणी सुटणार :- आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत लवकरच पाणी सुटणार :- आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख
सांगोला प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणीचे पत्र काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी दिले होते. आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश आलेले असून लवकरच कोरडा नदीत पाणी सुटणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगोला तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ गावे यात येत असून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीवर १९ बंधाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या १९०० ते २००० हेक्टर जमिनीसाठी पाणीसाठा कमी क्षमतेने असल्याने सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी तात्काळ सोडल्याने माण व कोरडा नदीवर अवलंबून असणारे १९ बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार असून शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न याद्वारे तात्काळ मार्गी लागणार आहे.
आ.डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीनुसार सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्यात येणार असून सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात यावेत असे आदेश जलसंपदा मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक दर्शवत पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने आमदार डॅा.बाबसाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.



