सांगोला

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुळे सांगोला शहर व तालुक्यातील रुग्णांची गैरसोय दूर झाली : अस्मिरभाई तांबोळी  

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुळे सांगोला शहर व तालुक्यातील रुग्णांची गैरसोय दूर झाली : अस्मिरभाई तांबोळी  

 

सांगोला / प्रतिनिधी

छोट मोठ्या आजारावर यापूर्वी रुग्णांना सांगली – मिरज – सोलापूर व पुणे यासारख्या ठिकाणी जावे लागत होते. यामध्ये अनेक रुग्णांना जीवन मृत्यूचा सामना करावा लागला आहे. तर अनेक कुटुंबांना आर्थिक झळी सोसावी लागली आहे. परंतु पुणे, सांगली, मिरज, सोलापूर यासारख्या उपचाराच्या सुविधा आता आपल्या सांगोल्यात दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मिळत असल्यामुळे येथील रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे असे मा. नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी यांनी सांगितले आहे.

अनेकदा वेळेत उपचार मिळाले नसल्याने तालुक्यातील काही रुग्णांना जीवन मृत्यूचा सामना करावा लागला आहे. ही बाबा अनेकांनी अनुभवले आहे. यामुळे लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी व सांगोला तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता, तालुक्याच्या ठिकाणी मोठे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल असणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून तालुक्यातील रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टर मंडळींनी एकत्रित येऊन दक्षता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या नावाने सुरू केलेले हॉस्पिटल आज अनेक रुग्णांना नवसंजीवनी ठरत आहे. सांगोल्यासारख्या ग्रामीण भागातील रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. यामध्ये सदर कुटुंबाला मोठी आर्थिक झळ बसत होती. दरम्यान नातेवाईकांची तारांबळ उडत होती. आज दक्षता हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे या ठिकाणी तालुक्यातील शहरासह गावगाड्यातील रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत. यामध्ये विविध शासकीय योजना याच ठिकाणी राबविण्यात येत असल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक बचत ही झाली आहे. तसेच अनेकांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे जीवनदान मिळाले आहे. यामुळे दक्षता हॉस्पिटल मुळे निश्चितपणे सांगोल्याची गैरसोई दूर झाली असल्याचे माजी नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button