चिकमहूद येथे आज स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन ; शहाजीबापूंचे पत्रिकेत नावच नाही
शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून काम मंजूर ; स्वतःच्या गावातील कार्यक्रमाच्या पत्रिकेतून बापू मात्र गायब

चिकमहूद येथे आज स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन ; शहाजीबापूंचे पत्रिकेत नावच नाही
शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून काम मंजूर ; स्वतःच्या गावातील कार्यक्रमाच्या पत्रिकेतून बापू मात्र गायब
सांगोला : तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा सोमवार दि १७ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे. चिकमहूद ता सांगोला येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई आदिसंह आमदार खासदार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत योजना मंजूर करणारे तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांचे नावच गायब असल्याने त्यांच्या समर्थकातून नाराजी व्यक्त होत आहे.
दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतीसाठी उजनी धरणातून पाणी मिळावे यासाठी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी 1995 ते 99 दरम्यान ते आमदार असताना प्रयत्न केले होते. यावेळी त्यांनी उजनी उपसा सिंचन योजना मंजूर केली होती मात्र ते आमदार पदावरून पायउतार होताच ही योजना धुळखात पडली होती सतत १५ हून अधिक वर्षे या योजनेवर एकही रुपया खर्च न झाल्याने शासकीय दरबारी उजनी उपसा सिंचन योजना काळ्या यादी समाविष्ट झाली. यामुळे सांगोला तालुक्यातील शेतीला उजनीचे पाणी मिळेल ही आशाच मावळली होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील हे पुन्हा सांगोला विधानसभेचे आमदार झाले आणि त्यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्धार केला तत्कालीन सरकारचे लाडके आमदार असलेल्या शहाजी बापू पाटील यांनी आपले राजकीय वजन वापरून शासकीय यादीत बंद असलेली ही योजना पुन्हा मंजूर करून घरी आणि या योजनेचे नामांतर करून पूर्वी उजनी उपसा सिंचन योजना असलेल्या या योजनेला स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना असे नाव दिले. आणि या योजनेसाठी ८८४ कोटींची मंजुरी घेतली. या योजनेतून सांगोला तालुक्यातील शेतीला तब्बल २ टी एम सी इतके पाणी मिळणार आहे. या पाण्यातून २२ गावांतील तब्बल १३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेचा सुमारे ३०० कोटींचा पहिला टप्पा आता सुरू होणार असून त्याच्याच कामाचे हे भूमिपूजन होणार आहे.
सोमवार दि १७ रोजी होणाऱ्या या भूमिपूजन कार्यक्रमाची शासकीय पत्रिका नुकतीच बाहेर पडली असून या पत्रिकेत ज्यांनी बंद पडलेली योजना पुन्हा सुरू केली आणि ज्यांच्या जन्म गावातच हा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांचे नावच नसल्याने शहाजीबापू समर्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
शहाजीबापू पाटील यांनी २० ते २२ वर्षे बंद असणारी योजना सुरू करून या योजनेला तब्बल ८८४ कोटी रुपये मंजूर केले. केवळ एकच नाही तर सांगोला तालुक्यातील रखडलेल्या सर्वच योजनाचा पाठपुरावा करून त्यांनी टेंभू योजना, म्हैसाळ योजना आणि स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पूर्णत्वास आणल्या सांगोला तालुक्यात त्यांनी ५ हजार हून अधिक कोटींचा विकास निधी आणला त्यांच्याच प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आले त्यामुळे पत्रिकेत नाव असले किंवा नसले यामुळे काही फरक पडणार नाही तालुक्यातील प्रत्येक घटकाला ही कामे कुणी केली हे माहित आहे.
मा. समीर पाटील, शहर प्रमुख युवासेना, सांगोला.