राजकीय

उपक्रमशील विद्यार्थीप्रिय शिक्षक दिपक परचंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

माळशिरस प्रतिनिधी :

 

जय विजय शिक्षक पतसंस्था व जय विजय शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा तालुकास्तरीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय व तंत्रस्नेही शिक्षक दिपक परचंडे यांना जाहीर झाला आहे.

 

२०१८ पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी नं. २ येथे कार्यरत असलेले परचंडे सर यांनी बिकट अवस्थेतील शाळेला नवे वैभव प्राप्त करून दिले. पटसंख्या सहा वरून बेचाळीसवर नेण्यापासून शालेय दर्जेदार उपक्रम, स्पर्धा, मेळावे, शिक्षणात नावीन्यपूर्ण उपक्रम अशा विविध माध्यमातून त्यांनी शाळेत आनंददायी व शैक्षणिक वातावरण निर्माण केले.

 

विद्यार्थ्यांना पाणी, वीज, साऊंड सिस्टिम, वर्गखोल्यांमध्ये प्रकाश, शाळेचे सौंदर्यीकरण, संरक्षक भिंत, कलामंच, सौर प्रकल्प, स्वच्छतागृहे आदींसह तब्बल १२ लाख रुपयांची विकासकामे ग्रामपंचायत व संस्थांच्या सहकार्यातून उभी केली. स्वतःच्या खर्चातूनही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

 

केंद्रस्तरीय टॅलेंट हंटसह कबड्डी, खो-खो, समूहगीत, वक्तृत्व आदी क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून परचंडे सरांचा वाटा मोलाचा आहे.

 

या पुरस्काराबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत तांदुळवाडी, गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम, केंद्रप्रमुख जमादार सर, मुख्याध्यापक प्रशांत जाधव तसेच विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button