सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध
सांगोला (प्रतिनिधी) :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार मा. श्री. जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या अपशब्दाच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
यासंदर्भात सांगोला तहसीलदार यांना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवणाऱ्या व सभागृहाची प्रतिष्ठा घालवणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ घ्यावा. तसेच अशा व्यक्तीला सभागृहात प्रवेशास मज्जाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुढे निवेदनात नमूद करण्यात आले की, “जर असे बेताल वक्तव्य पुन्हा झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटतील.”
निवेदनाद्वारे सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेल्या वक्तव्याचा “जाहीर निषेध… निषेध… निषेध…!” असा घोषणा देऊन तीव्र आवाजात विरोध दर्शविला.



