सांगोला

सांगोला नगरपरिषदेकडून थकीत गाळा भाडेकरूंवर कारवाई, अनेक गाळे सील

सांगोला प्रतिनिधी : 

 

सांगोला नगरपरिषदेच्या थकीत गाळा भाडेकरूंवर कठोर कारवाई करण्यात आली असून, थकीत भाडे न भरल्यामुळे आज अनेक गाळे सील करण्यात आले. नगरपरिषदेकडून वारंवार नोटीस बजावूनही संबंधित भाडेकरूंनी थकीत रक्कम भरलेली नव्हती. यामुळे 7 दिवसांची, 3 दिवसांची आणि अखेर 24 तासांची अंतिम नोटीस दिल्यानंतरही भरणा न करणाऱ्या भाडेकरूंच्या गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले.

सील करण्यात आलेले गाळे पुढीलप्रमाणे .श्री. संग्राम नागनाथ सक्रे, भाजी मंडई लगत,श्री. नौशाद पापा मुलाणी, त्रिमूर्ती टाकी समोर,श्री. मयूर राजेंद्र डोंगरे,श्री. जमील हसन शेख,श्री. विजय वसंत सुपेकर

सदर कार्यवाही मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन पाडे आणि कर निरीक्षक श्री. रोहित गाडे यांच्या नेतृत्वात लिपिक श्री. सागर पवार, श्री. आनंद हुलजंतीकर, श्री. रामा सागर, श्री. निकोप ठोकळे आणि श्री. रमेश मोरे यांनी केली.

पाणीपट्टी थकबाकीदारांवरही कारवाई सुरू

यासोबतच, कर व प्रशासकीय अधिकारी श्री. महेश रजपूत आणि अस्मिता निकम तसेच पाणीपुरवठा अभियंता श्री. करण सरोदे यांच्या नेतृत्वाखाली थकीत पाणीपट्टी भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

थकीत रक्कम त्वरित भरण्याचे आवाहन

नगरपरिषदेकडून सांगोला शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी थकीत रक्कम त्वरित भरून सहकार्य करावे, अन्यथा अशा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button