सांगोला : भीषण अपघातात बँक कॅशियर व त्यांच्या पत्नीचा मृत्यू, मुलगा जखमी

सांगोला : भीषण अपघातात बँक कॅशियर व त्यांच्या पत्नीचा मृत्यू, मुलगा जखमी
सांगोला (प्रतिनिधी):-
सांगोला – शिरभावी रस्त्यावर इंगळेपाटी पेट्रोलपंपाजवळ दुचाकी अपघातात बँक ऑफ महाराष्ट्र, शिरभावी शाखेतील कॅशियर धनंजय तुकाराम क्षीरसागर (वय 50) आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा धनंजय क्षीरसागर (वय 44) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी असून, रुग्णालयात उपचार घेत आहे.
सदरची घटना दिनांक 25 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती कुटुंबीयांना त्यांचा मित्र अशोक पवार याने दिली. त्यानंतर धोंडीराम दत्तात्रय कमलापुष्कर आणि त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर जखमींना तातडीने सरकारी अँब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी धनंजय क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा यांना मृत घोषित केले.
धनंजय क्षीरसागर हे बँक ऑफ महाराष्ट्र, शिरभावी शाखेत कॅशियर म्हणून कार्यरत होते. तर त्यांचा मुलगा शिरभावी येथील यशवंत हायस्कूलमध्ये नववीत शिक्षण घेत आहे.अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, सांगोला पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.