राजकीय

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून लावली फिल्डींग

माढ्यातून कमबॅक करण्याच्या तयारीत

रणजितसिंह नाईक-निंबाळकर ॲक्शन मोडवर
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून लावली फिल्डींग

सांगोला / तालुका प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाला मोठा सेट बॅक बसला. अनेक महत्त्वाच्या जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापैकी माढा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभवही पक्षाच्या आणि स्वतः नाईक-निंबाळकर यांच्या

जिव्हारी लागला आहे. माढ्यातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मैदानात उतरून त्याच ताकदीने कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माण-खटाव आणि फलटण या विधानसभा मतदारसंघापैकी माण खटाव, फलटण, सांगोला या मतदारसंघात नाईक निंबाळकर यांना आघाडी मिळाली होती

तर माढा, करमाळा आणि माळशिरसमधून विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना आघाडी मिळाली. लोकसभा निवडणुक

झाल्यापासून नाईक निंबाळकर यांनी होमपीच असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष घालून रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवाराचा पराभव करून आपल्या विचारांचा आमदार फलटणमधून निवडून आणला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात पुन्हा संघटनात्मक बांधणी करून या भागात झालेली पिछाडी भरून काढण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे

नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून यांनी फिल्डींग लावली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघातही त्यांनी लक्ष घातले असून शेतकरी कामगार पक्षातील अनेक नेत्यांना गळ घातली आहे. त्याचबरोबर अॅड. शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे-पाटील हे दोन माजी आमदार ही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या संपर्कात असल्याचे सध्या दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button