सांगोला

सांगोला नगरपरिषदेत पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 30 पथविक्रेत्यांना कर्ज धनादेश वितरण

सांगोला नगरपरिषदेत पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 30 पथविक्रेत्यांना कर्ज धनादेश वितरण

सांगोला : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम आज दि. 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात उत्साहात पार पडला.

तिरुवनंतपुरम (केरळ) येथे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या कर्ज वितरण व क्रेडिट कार्ड उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगोला नगरपरिषद येथील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांनी या कार्यक्रमात आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने सहभाग नोंदविला.

या वेळी मा. नगराध्यक्ष श्री आनंदभाऊ माने व मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते शहरातील 30 पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच पात्र पथविक्रेत्यांना कर्ज मंजुरीची पत्रेही प्रदान करण्यात आली.

नगराध्यक्ष आनंद माने यांनी लाभार्थ्यांना मिळालेल्या कर्जाची वेळेत परतफेड करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच ज्या पथविक्रेत्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी पुढाकार घेऊन योजनेची माहिती घ्यावी व लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक श्री. नागेश गुंजोटे, युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्ज व्यवस्थापक श्री. प्रवीण खटकाळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button