शैक्षणिक
पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये इ.१० वी साठी मराठी व समाजशास्त्र विषयाचे गेस्ट लेक्चर संपन्न

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये इ.१० वी साठी मराठी व समाजशास्त्र विषयाचे गेस्ट लेक्चर संपन्न
सांगोला प्रतिनिधी
- खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल, पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी मध्ये समाजशास्त्र तज्ञ शिक्षक श्री. निवास येलपले सर आणि मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री रमेश येलपले सर यांच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते.
दि.१ फेब्रुवारी रोजी समाजशास्त्र विषय अध्यापनाचा २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व २० दहावी बोर्ड परीक्षक व ५ वर्षे मॉडरेटर चा अनुभव असणारे श्री.निवास येलपले सरांनी विद्यार्थांना समाजशास्त्र विषयाचे विस्तृत ज्ञान दिले. बोर्ड पेपरचे स्वरूप कसे असते?पेपर कसा सोडवावा तसेच पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून समाजशास्त्र विषयाच्या अभ्यास पद्धती समजावून सांगितल्या. तसेच काही उदाहरणे समजावून सांगितली. विद्यार्थांना समाजशास्त्र विषयाची भीती दूर होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स देऊन विस्तृत मार्गदर्शन केले.
दि.२ फेब्रुवारी रोजी मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक व गेली ५ वर्षे दहावी बोर्ड साठी मॉडरेटर म्हणून काम पाहणारे श्री.रमेश येलपले सरांचे मराठीचे गेस्ट लेक्चर पार पडले. यावेळी सरांनी मराठी गद्य ,पद्य , मराठी साहित्य व मराठी व्याकरण यांचा अभ्यास कसा करावा यांच्या टिप्स देऊन मराठी विषयाचे विस्तृत ज्ञान देऊन विद्यार्थांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले.
श्री.निवास येलपले सर व श्री.रमेश येलपले सर यांनी गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन करून दहावी बोर्ड पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे हे सांगून उत्कृष्ट पेपर कसा लिहावा हे सांगून बोर्ड परीक्षेची भीती दूर करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
या गेस्ट लेक्चर चे आयोजन प्राचार्य श्री.अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विषय शिक्षक श्री. आशुतोष रूपनर सर आणि मराठी विषय शिक्षिका सौ.स्वाती म्हेत्रे मॅडम व इतर सहकारी शिक्षकांनी केले होते.