राजकीय

भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विक्रमी सदस्य नोंदणी

भाजप सदस्य अभियानात सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा राज्यात पहिल्या नंबरवर

भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विक्रमी सदस्य नोंदणी

भाजप सदस्य अभियानात सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा राज्यात पहिल्या नंबरवर

सांगोला (तालुका प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियानांतर्गत राज्यात सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तथा संघटन पर्व प्रभारी रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आयोजित विभागीय कार्यशाळेत सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची पकड अधिक घट्ट करण्याकरिता प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशान्वये सदस्य नोंदणीची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा भाजप सदस्य नोंदणीत महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. त्याची पोचपावती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या साक्षीने भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा सन्मान करून शाबासकी दिली आहे. भाजप सदस्य नोंदणी अभियानास १९ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाने २ लाख ६२ हजार ५२३ सदस्य नोंदणीचा टप्पा गाठत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे कौतुक करून जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा सन्मान केला आहे.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. यासाठी सदस्य नोंदणीचे उदिष्ट पूर्ण करा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून भाजप सदस्य मोहिमेत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील तालुकाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख यांनी मेहनत घेऊन जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ५२३ सभासद नोंदणी केली आहे. राज्यात झालेल्या या सन्मानाने सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असून त्यांची मान उंचावली आहे, असे मत जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तथा संघटन पर्व प्रभारी रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी केली आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भाजपचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. सदस्य नोंदणी मोहिमेत संघटनेतील सर्वांनी अपार परिश्रम घेतल्यानेच राज्यात प्रथम क्रमांक आला असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button