सौ.वैशाली घोडके मॅडम यांचा आदर्श गणित शिक्षक पुरस्काराने सन्मान

सौ.वैशाली घोडके मॅडम यांचा आदर्श गणित शिक्षक पुरस्काराने सन्मान
सांगोला प्रतिनिधी :
सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारा २०२४-२५ चा आदर्श गणित शिक्षक पुरस्कार नुकताच सांगोला शहरातील नामांकित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेजच्या सौ.वैशाली घोडके मॅडम यांना नुकताच सोलापूर येथे दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा.डॅा. अशोकराव शिंदे यांच्या शुभहस्ते प्रशालेत मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज चे प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर , तात्यासाहेब इमडे सर, सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम, जेष्ठ शिक्षक औदुंबर कांबळे सर, माणिकराव देशमुख सर उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थासंचालक डॅा. अशोकराव शिंदे सर म्हणाले की, वैशाली घोडके मॅडम या गेली २३ वर्षे गणित विषयाचे अतिशय चिकाटीने अध्यापन करत असून त्यांनी कायम विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या सेवेच्या कारकिर्दीत त्यांनी यशस्वीरित्या काम केलेल आहे. आपल्या सत्कार समारंभावेळी बोलताना सौ. वैशाली घोडके मॅडम म्हणाल्या की, माझ्या आजच्या या आदर्श गणित शिक्षक पुरस्कारात सर्वात मोठा वाटा हा न्यू इंग्लिश स्कूल परिवाराचा असून मला याचा सार्थ अभिमान आहे. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून नेहमी कार्यरत राहिले म्हणूनच इथपर्यंत पोहचले आहे. तसेच आजपर्यंतच्या या वाटचालीत माझे आई, वडिल, पती, मुले या सर्वांचेही मोलाचे योगदान आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य फुले सर यांनी केले तर शेवटी आभार प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी मानले.
सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिकेत देशमुख,सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॉ.अशोकराव शिंदे,प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर, यांनी सौ.वैशाली घोडके मॅडम यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.