आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांचे दिले निवेदन.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांचे दिले निवेदन.
सांगोला प्रतिनिधी :
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील विविध जाचक अटी व नियमावलीत बदल करण्यासंदर्भात व तसेच डॉक्टरांचे दैनंदिन अडचणी विषयी बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी 12.30 वाजता निवेदन देण्यात आले.
सांगोला तालुक्यातील सर्व हॉस्पिटल, क्लिनिक दवाखाने बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन करण्यासाठी सरकारने जे निर्णय व जाचक अटी बनविल्या आहेत. त्यामध्ये खूप किचकट प्रक्रिया व जाचक अटी बनविल्या आहेत. त्यामध्ये किचकट प्रक्रिया केलेली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी छोटे व मध्यम रुग्णालयाचे या खर्चामुळे कंबरडे मोडले आहे.
यामुळे सर्व डॉक्टरांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम होत आहे. रुग्णसेवा व्यवसाय जाचक अटींना कंटाळून बंद करावा का? असा प्रश्न पडलेला आहे.
हॉस्पिटल पडताळणीच्या नावाखाली डॉक्टरांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.
हॉस्पिटलला येणारा बॉम्बे नर्सिंगसाठीचा सर्टिफिकेट व नगरपालिकेचे एनओसी सर्टिफिकेट मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च येत आहे.
व तसेच Fire Audit System सर्व हॉस्पिटल ला बसवणे बंधनकारक केले आहे. या सिस्टीमचा खर्च बसविणाऱ्या एजन्सी त्यांच्या मनाप्रमाणे लाखो रुपये अडवून घेत आहेत.
यामुळे डॉक्टरांची आर्थिक पिळवणूक व डोके दुखी होत आहे. याच्या अगोदर एवढा खर्च येत नव्हता.
40 ते 50 सर्टिफिकेट आत्ताच्या नियमावलीनुसार लागत आहेत. त्यामुळे सांगोला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सांगोला, एम. पी. सी. बी ऑफिस सोलापूर व सिव्हिल सर्जन सोलापूर यांच्याशी बोलून वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात व येणाऱ्या अधिवेशनामध्ये आवाज उठवावा व डॉक्टरांना न्याय मिळवून द्यावा आशा मागण्यांचे निवेदन सांगोला तालुक्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांना दिले.
यावेळी निवेदन देताना डॉ विजय बंडगर, डॉ एच. व्ही. गावडे, डॉ संतोष पिसे, डॉ, सुनील लवटे, डॉ, निरंजन केदार, डॉ विजय इंगवले इत्यादी उपस्थित.