पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये इ.१० वी साठी हिंदी विषयाचे गेस्ट लेक्चर संपन्न

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये इ.१० वी साठी हिंदी विषयाचे गेस्ट लेक्चर संपन्न
सांगोला प्रतिनिधी
खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल, पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी मध्ये प्रा.मनोज दत्तात्रय जांगळे सरांचे हिंदी विषयाचे गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते.
जांगळे सरांनी विद्यार्थांना हिंदी विषयाचे विस्तृत ज्ञान दिले. बोर्ड पेपरचे स्वरूप कसे असते?पेपर कसा सोडवावा तसेच पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून हिंदी विषयाच्या अभ्यास पद्धती समजावून सांगितल्या. तसेच हिंदी व्यकरणा काही उदाहरणे समजावून सांगितली. विद्यार्थांना हिंदी विषयाची गोडी निर्माण व्हावी व हिंदी विषयाचे भीती दूर होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स देऊन विस्तृत मार्गदर्शन केले.
पायोनियर स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ शिक्षकांचे विशेष गेस्ट लेक्चर चे आयोजन करून विद्यार्थांना प्रत्येक विषयाचे विस्तृत ज्ञान दिले जाते. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आता आयोजित करून प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात.
आजच्या गेस्ट लेक्चर चे आयोजन प्राचार्य अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विषय शिक्षिका परवीन मिस व इतर सहकारी शिक्षकांनी केले होते.