वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांच्या पथकाची मोठी कारवाई — अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारे वाहन पकडले

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांच्या पथकाची मोठी कारवाई — अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारे वाहन पकडले
सांगोला, दि. १८ जून २०२५ : सांगोला वनविभागाच्या पथकाने आज सकाळी १०:३० वाजता मोठी कारवाई करत अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त केले. ही कारवाई सांगोला तालुक्यातील एच.टी. गट नंबर 10 परिसरात करण्यात आली.
वनविभागाच्या पथकाने तपासणीदरम्यान महिंद्रा कंपनीचे MH 45 A 5660 क्रमांकाचे वाहन अडवले असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सागवान व इतर मौल्यवान लाकूड आढळून आले. सदर लाकूड वाहतूक कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेल्या लाकडाचे एकूण प्रमाण अंदाजे 3.916 घनमीटर असून, याची बाजारात किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. सदर वाहनासह लाकूड जप्त करून पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी वनविभागाने प्रकरण हाताळले आहे.
ही कारवाई सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध लाकूड तस्करीवर आळा बसवण्यासाठी वनविभागाने घेतलेली ही तत्काळ व ठोस कारवाई कौतुकास्पद ठरत आहे.