महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त सांगोल्यात पानपोई सुरू

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त सांगोल्यात पानपोई सुरू
सांगोला, दि. 20 मार्च 2025 – महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या ऐतिहासिक स्मरणार्थ, बुद्ध भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी पानपोई सुरू करण्यात आली.
ही पानपोई सुरू करण्यामागील मुख्य उद्देश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे, सामाजिक क्रांती घडवणे आणि उन्हाच्या कडाक्यात नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. सध्या सांगोला तालुक्यातील उष्णतेची तीव्रता वाढत असून, नागरिकांना उन्हाच्या त्रासातून दिलासा मिळावा, यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.ॲड. अक्षयदादा बनसोडे, उपाध्यक्ष राज चंदनशिवे, प्रशांत गायकवाड, सचिव विशाल वाघमारे, सहसचिव भारत हातेकर, प्रविण मोहिते, खजिनदार बंडू शिंदे, सहखजिनदार अजय वाघमारे तसेच आबा गुळीग, सागर राऊत, गणेश वायदंडे, प्रणय कांबळे, रोहित कांबळे, परमेश्वर ठोकळे, महादेव चंदनशिवे, लखन पवार, राहुल बनसोडे, रोहित चंदनशिवे, रोहित सोनवणे, रामचंद्र सोनवणे, समाधान कांबळे, लखन मोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक माहूरकर साहेब यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला नगरपालिका माजी नगराध्यक्ष मा. श्री मारुती आबा बनकर, उद्योगपती बाळासाहेब झपके, अमोल बनसोडे (अध्यक्ष), बापूसाहेब ठोकळे, दिपकराव बनसोडे, वीर सावंत, नीलकंठ माने आदि मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, उन्हाळ्यात नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे. बुद्ध भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे सांगोला तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.