सांगोला

“महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारा सांगोल्याचा जिजाऊ सृष्टी प्रकल्प”

मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन प्रकल्पास सर्वोपतारी सहकार्य करण्याचे दिले संकेत..

सांगोला (प्रतिनिधी):

सांगोला तालुक्यातील होतकरू व नवउद्योजकांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेला ‘जिजाऊ सृष्टी सांगोला’ हा एन.ए. ओपन प्लॉटिंगचा प्रकल्प तालुक्याच्या प्रगतीला नवा आयाम देणारा ठरत आहे. या प्रकल्पाला नुकतीच मा. आमदार श्री. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला, प्रत्यक्ष फेरफटका मारला आणि प्रकल्पामध्ये होणाऱ्या आधुनिक सोयीसुविधा पाहून समाधान व्यक्त केले.

सोलापूर बायपास जवळ सांगोला–महूद रोडवरील गणपती मंदिराशेजारी उभारण्यात आलेला हा भव्यदिव्य प्रकल्प ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या आकर्षक सोयीसुविधांनी सज्ज आहे. संपूर्ण प्रकल्पात मजबूत डांबरी रस्ते, विजेसाठी स्वतंत्र डी.पी.ची व्यवस्था, भूमिगत गटारी (अंडरग्राउंड ड्रेनेज), आरामदायी बेंचेस, स्विमिंगसाठी झुले, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि सुसज्ज वाचनालय कॉर्नर, इलेक्ट्रिक पोल व स्ट्रीट लाईट्स, मुलांसाठी खेळण्यांची साधने, चिल्ड्रन पार्क, आधुनिक ओपन जिम, ध्यानमंदिर आणि वॉटर फाउंटन अशा एकापेक्षा एक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प सांगोला तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील एक आगळावेगळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

 

या प्रकल्प अकोला जिल्ह्यातील होतकरू उद्योगपतींचा मोलाचा वाटा आहे. अकोला जिल्हा परिषदेचे माजी सभापती सम्राट डोंगरेदिवे आणि त्यांचे भागीदार संतोष घुले पाटील या दोघांनी मिळून ‘आस्था डेव्हलपर्स’ च्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला आहे. सांगोला तालुक्याच्या वैभवात भर घालणारा, सांगोलकरांना विश्वासाने सेवा देणारा आणि आधुनिकतेसह सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम त्यांच्या दूरदृष्टी व उद्योगशीलतेचे द्योतक आहे.

 

भेटीदरम्यान मा. आमदार श्री. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की –

“सांगोला तालुक्याच्या वैभवात आणखी एक मोलाची भर घालणारा हा प्रकल्प केवळ ग्राहकांसाठीच नव्हे तर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा आहे. होतकरू व नवउद्योजकांनी उभारलेला हा प्रकल्प पाहून मला मनस्वी आनंद झाला असून या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्वोपतारी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो.”

 

यावेळी त्यांनी सम्राट डोंगरेदिवे व संतोष घुले पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले व त्यांच्या उद्यमशीलतेचे अभिनंदन केले.

 

या प्रसंगी प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवउद्योजक व ग्राहक उपस्थित होते. प्रकल्पातील आधुनिकता व चांगल्या नियोजनामुळे सांगोला तालुक्याच्या विकासात नवा आदर्श निर्माण होणार असून ‘जिजाऊ सृष्टी सांगोला’ हा प्रकल्प भविष्यात तालुक्याच्या वैभवाचा नवा दीपस्तंभ ठरणार आहे, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारा ‘जिजाऊ सृष्टी सांगोला’ हा प्रकल्प आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असून सर्वसामान्य लोकांच्या निवासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठीही तो आकर्षण ठरणार आहे. होतकरू व नवउद्योजकांनी उभारलेल्या या प्रकल्पाला मी मनापासून शुभेच्छा देतो. या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्वोपतारी सहकार्य करण्याचे आश्वासन मी देतो.”

मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button