शैक्षणिक

विद्यामंदिर हायस्कूल, एकतपूर येथे हिंदुस्तान फीड्सतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

विद्यामंदिर हायस्कूल, एकतपूर येथे हिंदुस्तान फीड्सतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

एकतपूर, दि. 29 फेब्रुवारी 2025 – विद्यामंदिर हायस्कूल, एकतपूर येथे हिंदुस्तान कॅटल फीड्स या महाराष्ट्रातील आघाडीच्या पशुखाद्य निर्मिती कंपनीतर्फे इयत्ता सातवी ते नववीच्या सर्व विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये एक स्कूल बॅग, टिफिन बॅग आणि टिफिन यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर चांदणे होते. त्यांनी आपल्या भाषणात हिंदुस्तान फीड्स कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला हिंदुस्तान फीड्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर श्री. निलेश इंगळे, श्री. मदने, श्री. साखरे, तसेच निवृत्ती सेवा संघाचे अध्यक्ष माननीय कृषिभूषण प्रभाकर काका चांदणे हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मुक्ताई दूध संकलन केंद्राचे चेअरमन श्री. वसंत इंगोले, मायाक्का दूध संकलन केंद्राचे सचिव श्री. अभिजीत चोरमले, चेअरमन व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. अजित बुरुंगले, श्री. विजय इंगोले तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. जितेश कोळी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विवेक घाडगे सर यांनी मानले.

विद्यार्थ्यांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले असून, हिंदुस्तान फीड्स कंपनीच्या या उपक्रमामुळे शालेय जीवन समृद्ध होईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button