लग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळून गोरे नवदांपत्याकडून आपुलकी प्रतिष्ठानला ५००१ रुपये देणगी!

सांगोला ( प्रतिनिधी )-
लग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळून कै. सौ. स्वाती नागेश गोरे यांच्या स्मरणार्थ गोरे नवदांपत्याकडून आपुलकी प्रतिष्ठानला ५००१ रुपये देणगी देऊन एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
चिंचोली ता. सांगोला येथील गोरे परिवाराने २२ जानेवारी रोजी कुटुंबातील सदस्याचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करून अनावश्यक खर्चाला फाटा दिला. आणि सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक क्षेत्रात सांगोला तालुक्यात अग्रगण्य असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान या संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी ५००१ रुपयाची देणगी बुधवारी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अरविंद डोंबे, सुरेशकाका चौगुले, शशिकांत येलपले, रमेश गोडसे, बाळासाहेब वाघमारे, सुभाष पाटोळे, अरविंद केदार, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, वसंत माने, दादा खडतरे आदीसह गोरे कुटुंबीय उपस्थित होते.