राजकीय

पालकमंत्री जयाभाऊंचा या दिवशी लागणार कस ; तीन खासदार, नऊ आमदार विरोधात

सोलापूर प्रतिनिधी

पालकमंत्री जयाभाऊंचा या दिवशी लागणार कस ; तीन खासदार, नऊ आमदार विरोधात
सोलापूर : राज्यामध्ये महायूतीची एकहाती सत्ता आल्यानंतर सोलापूरचा पालकमंत्री पदी स्थानिकांना डावलून साताऱ्याचे जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाली. मागील दोन दौऱ्यामध्ये जया भाऊंनी स्थानिक भाजपच्या नेत्यांशी पहिल्याच भेटीत सूर जुळवून घेतले आहेत. त्यांच्या कामाची झलक अनेकांना पाहायला मिळाली.

प्रशासनाच्या बाबतीत ते स्ट्रिक्ट असल्याचे पाहायला मिळते. माध्यम प्रतिनिधींची सुद्धा त्यांनी मित्रत्वाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर जयकुमार गोरे अनेकांना आपले वाटू लागले आहे.

परंतु पालकमंत्री गोरे यांचा खरा कस आता येणाऱ्या 30 तारखेचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लागणार असून त्याला कारणही तसेच आहे. तीनही खासदार आणि तब्बल नऊ आमदार हे विरोधातील आहेत. त्यामध्ये खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, पदवीधर आमदार अरुण लाड त्यानंतर आमदार दिलीप सोपल, आमदार राजू खरे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार उत्तम जानकर हे सर्व विरोधात आहेत.

विरोधातील खासदार आणि आमदार पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत भारतीय जनता पार्टी आणि पालकमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधातील सहा आमदारांपैकी राजू खरे हे जास्त आक्रमक वाटतात. ते या सभेत कशा पद्धतीने प्रश्न मांडतात आणि प्रशासनाला तावडीत पकडण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा आहे.

 

सध्या राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. जयकुमार गोरे यांना पालकमंत्री करण्यात राम सातपुते यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे आता मोहिते पाटील गटाचे आमदारांची भूमिका कशी असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button