पंढरपूरला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करा : माऊली हळणवर

प्रतिनिधी.मुबंई
आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भाजपाचे नेते माऊली भाऊ हळणवर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली की सोलापूर हा जिल्हा क्षेत्रफळाने प्रचंड मोठा आहे सोलापूरला इतर तालुक्यातून येणे जाणे 150 ते 160 किलोमीटर अंतर होते शासकीय कामाला जनतेला दोन-चार हेलपाटे घालावे लागतात प्रचंड गर्दी होते त्यामुळे कामे होयाला विलंब लागतो
पंढरपूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून पंढरपूरला येण्या जाण्यासाठी चारी बाजूंनी नॅशनल हायवे चे जाळे आहे रेल्वे आहे या ठिकाणी अगोदरच हिवताप जिल्हा कार्यालय जिल्हा सत्र न्यायालय असे अनेक कार्यालय या ठिकाणी आहेत वर्षातून पंढरपूरला चार वाऱ्या भरतात कायमस्वरूपी या ठिकाणी व्हीआयपी लोकांची गर्दी असते त्यामुळे येथील अधिकाऱ्यांवरती ताण येतो तसेच पंढरपूरच्या आजूबाजूंनी असलेल्या माळशिरस माढा करमाळा सांगोला मंगळवेढा या तालुक्यातील लोकांना येणे जाणे सोपे आहे..
म्हणून पंढरपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यास सोलापूर जिल्ह्याचे दोन भाग होतील त्यामुळे गर्दी कमी होऊन कामाची उरक लवकर होईल
म्हणून पंढरपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून या सोलापूर जिल्ह्यातील लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे नेते माऊली हळणवर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे केली असता मंत्री महोदयांनी सकारात्मक विचार असल्याचे सांगून मंत्रिमंडळ यावर लवकरच निर्णय घेईल असे आश्वासन दिले