शैक्षणिक

गुडनेस स्पोकन इंग्लिश सेंटरचा १५ वा वर्धापन दिन साजरा. 

गुडनेस स्पोकन इंग्लिश सेंटरचा १५ वा वर्धापन दिन साजरा.

 

सांगोला प्रतिनिधी :

 

संस्थापक :निलेश प्रदीप डोंगरे( सर), संचलित गुडनेस स्पोकन इंग्लिश सेंटर, सांगोला गेली १५ वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत आहे .”असे कोणते क्षेत्र नाही जिथे इंग्लिश बोलणे व व्याकरणाचा वापर होत नाही”.१० वी ,१२ वी नंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी व जॉब साठी मोठ्या शहरांमध्ये जातात.पण तेथे गेल्यानंतर इंग्लिश चे अडचण नेहमी जाणवते.इंटरव्यू असो व लेक्चर्स एका इंग्लिश विषयामुळे खूप ठिकाणी अपयश भेटते.नंतर हेच विद्यार्थी त्या शहरांमध्ये क्लास लावण्याचा प्रयत्न करतात पण प्रमाणापेक्षा जास्त फी शहरात आकारली जाते .तेथे राहून शिक्षण घेणे हे परवडणारे नसते .याच गोष्टीचा विचार घेऊन गुडनेस संस्था आज सांगोला शहरात १५ वर्षापासून कार्यरत आहे .४ थी पासून पुढील विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे.कोर्समध्ये शिकवल्या जाणाऱ्या स्टडी टेक्निक मुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात याचा निश्चित फायदा होतो .तसेच सहभागी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, मेडिटेशन हे कोर्स मोफत शिकवले जातात .तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील असलेली क्लास १/२ अधिकारी व यशस्वी असलेले सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती चे मार्गदर्शन दिले जातात.तसेच आजपर्यंत उपस्थित कार्यक्रमाला राहणारे प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे शब्दार्थ सांगणे, दररोज 100/200/ 500 वाक्य लिहिणे ,वेगवेगळ्या विषयावर इंग्लिश मध्ये प्रेझेंटेशन देणे, संभाषण व चर्चा केलेली प्रगती बघून कौतुकास्पद विद्यार्थी व त्यांना दिले जाणाऱ्या शिक्षकांना पाठीवरती थाप दिली.कारण बेसिक मुळाक्षरापासून शिकवले जाते .तसेच प्रत्येक आठ दिवसांनी पालकांशी विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाची चर्चा निलेश सर करतात.येत्या उन्हाळ्यात सुट्टी मध्ये विद्यार्थ्यांनी कोर्सला प्रवेश घेऊन अभ्यासामध्ये चांगली प्रगती करावी असे आवाहन केले.आजपर्यंत कोर्समध्ये विद्यार्थ्यांचा सराव सचिन उबाळे सर ,वैशाली जाधव मॅडम ,सुर्वे मॅडम, जमादार मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने करून घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, गोल्ड /सिल्वर मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button