सांगोला

ब्रेकिंग न्यूज – सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी १४१ तर पंचायत समितीसाठी १९७ एकूण ३३८ अर्ज दाखल, उद्या छाननी..!!

सांगोला प्रतिनिधी :-

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी शेवटच्या दिवशी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. अखेरच्या दिवशीपर्यंत एकूण ७२२ उमेदवारी अर्जांची विक्रमी विक्री झाली असून जिल्हा परिषद गटातून १४१ तर पंचायत समिती गणातून १९७, असे एकूण ३३८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सांगोला बाळूताई भागवत यांनी दिली.

जिल्हा परिषद गटांमध्ये महुद गटातून १६, एकतपूर १३, जवळा २८, कडलास २६, चोपडी २८, कोळा १६ व घेरडी गटातून १४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. एकूण जिल्हा परिषद गटातून १४१ अर्ज दाखल झाले आहेत.

पंचायत समिती गणांमध्ये महुद बुद्रुक १०, चिकमहुद १७, वाकी शिवणे १०, एकतपूर ११, वाढेगाव १०, जवळा १५, कडलास २३, अजनाळे १३, राजुरी १३, चोपडी २१, कोळा ७, हातीद १२, सोनंद ११ व घेरडी २४, असे एकूण १९७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा बी. आर. माळी यांनी दिली.

नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनोद घुगे व एपीआय पवन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त राबविण्यात आल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत, पंचायत समिती सांगोला यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button