क्राईम
ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू
सांगोला / तालुका प्रतिनिधी
- ट्रॅक्टर मधून खाली रोडवर पडल्याने ट्रॅक्टर ट्रेलरची चाके अंगावरून गेल्याने शेतमजूर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास बागलवाडी -अजनाळे रोडवरील मठ वस्ती नजीक घडली. अनिल किसन भंडगे -३५ रा अजनाळे ता सांगोला असे मृताचे नाव आहे याबाबत, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सांगोला यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे
याबाबत , अजनाळे येथील चालक शिवम देशमुख हा सोमवारी सकाळी १०:३० वाजता एम एच -१३ डीएम -४०३१ हा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्या घेऊन महीम ता सांगोला येथील शेतकऱ्यांकडे शेणखत भरण्यासाठी गेला होता दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये खत भरल्यानंतर तोच ट्रॅक्टर पुन्हा महीम येथून बागलवाडी मार्गे अजनाळे गावाकडे निघाला होता वाटेत बागलवाडी -अजनाळे रोडवरील मठवस्ती नजीक ट्रॅक्टर मध्ये बसलेला अनिल भंडगे हा अचानक रोडवर खाली पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रॉलीची चाकी गेल्याने हा अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिल भंडगे यास उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.