राजकीय
महिलांसाठी सोमवारी घेरडी येथे भव्य आरोग्य शिबीर

सांगोला प्रतिनिधी –
नवरात्र महोत्सवानिमित्त सांगोला तालुक्यातील स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी घेरडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून या शिबिराचे मार्गदर्शन डॉ. सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख करणार आहेत.
या शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी, शुगर तपासणी, रक्तदाब (बीपी) तपासणी तसेच हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे घेरडी व पंचक्रोशीतील सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन घेरडी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.



