आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश : नाझरा मंडलमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश : नाझरा मंडलमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू
सांगोला (प्रतिनिधी) :
सांगोला तालुक्यातील नाझरा मंडलमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेर सुरू होणार आहेत. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची खरी वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाझरा मंडलातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन पंचनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार देशमुख यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला पंचनामे करण्याच्या कठोर सूचना दिल्या.
तहसीलदारांनीही नुकसानीचे स्थळ पाहणी करून पंचनामे करून नुकसान भरपाई प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अतिवृष्टीमुळे नाझरा मंडलातील शेतशिवार व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र पंचनामे व नुकसान भरपाई प्रक्रियेत या मंडलाचा समावेश न झाल्याने शेतकरी नाराज होते. आता आमदार देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे पंचनामे सुरू झाल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे अभिनंदन होत असून समाधान व्यक्त केले जात आहे.



