लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिलांचा आधार आहे : माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने

सांगोला प्रतिनिधी:
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. सर्वसामान्य महिलांना आधार मिळावा, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी ही योजना सुरू केली. या योजनेमुळे कित्येक महिलांचे उदरनिर्वाह सुरळीतपणे सुरू आहेत. आता नुकताच जीआर आलेला आहे की लाडक्या बहिणीने प्रत्येक वर्षी ई केवायसी करणे बंधनकारक आहे. यामध्ये वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड नंबर टाकने आवश्यक आहे. परंतु ज्या महिलांना वडील किंवा पती नाहीत अशा महिलांसाठी यामध्ये दुसरा कोणताही पर्याय नाही. सध्या अशा महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे .आपली लाडकी बहीण योजना बंद तर पडणार नाही ना. इ केवायसी करण्यासाठी यामध्ये दुसरा मुद्दा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत या प्रश्नासाठी होय पर्याय निवडावा किंवा नाही या प्रश्नामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बहिणींसाठी 1500 रू म्हणजे खूप मोठा आधार आहे. शासनाने लवकरात लवकर या दोन्ही प्रश्नांचे निवारण करावे असे प्रतिपादन सांगोला नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ राणीताई माने यांनी केले आहे.



