गावाचा समृद्ध विकास पंचायत राजच्या यशस्वी अभियानातून शक्य – आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख
कमलापूर येथे मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध अभियान कार्यक्रम संपन्न

कमलापूर प्रतिनिधी :
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियाना अंतर्गत कमलापूर येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार देशमुख यांनी अध्यक्ष मनोगतामध्ये समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत कमलापूर गावातील पंचक्रोशीतील ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपापल्या विभागामार्फत तातडीने सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा. विशेषता कमलापूर गावातील पानंद रस्त्याचा विषय तातडीने मार्गी लावावा.अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने मदत केली पाहिजे.समृद्ध गावाच्या विकासामध्ये सर्वांचा समर्थ सहभाग असणे आवश्यक आहे. तरच गावाच्या विकासाबरोबरच राज्य पातळीवर ही आपले गाव चमकेल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून ओमतेज कुलकर्णी, सांगोला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप देवकते,फुले साहेब,विस्ताराधिकारी जगन्नाथ टकले, पुकळे साहेब इत्यादींनी या शिबिरामध्ये मोलाचे मार्गदर्शन केले.कमलापूर गावचे नेते बाबुराव बंडगर,तलाठी गणेश पंडित,जि.प चे सहशिक्षक रामचंद्र तंडे,बचत गटाच्या सविता गोडसे,इत्यादींनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर अभियानामध्ये उपस्थित सरपंच रूपाली तंडे, उपसरपंच श्रीमती सुमन पुजारी,चेअरमन धर्मराज टकले, व्हॉइस चेअरमन सुरेश केसकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास ढोले,उपाध्यक्ष सोमनाथ अनुसे,ग्रामपंचायतीचे मधुकर तंडे,युवा नेते रावसाहेब अनुसे,अंकुश गोडसे, नितीन काळे, सौ.कलावती बंडगर,लता गोडसे,रुक्मिणी आदलिंगे,प्रकाश ऐवळे,बाळासाहेब तोरणे,रामचंद्र देवळे,सखाराम आदलिंगे, चेअरमन दिलीप बंडगर,डॉ.सतीश तंडे, साधू गोडसे,विशाल गोडसे,अनिल पडवळे,इंजि.सागर अनुसे, पोलीस पाटील-विजय म्हेत्रे,सचिव- दत्तात्रय बंडगर,नारायण गोडसे,किसन म्हेत्रे,आबासो अनुसे,गोरख पुजारी, अर्जुन पुजारी, बजरंग पुजारी,बाबुराव तंडे,विजय देवकते,दामोदर तंडे,ज्ञानेश्वर तंडे,रामचंद्र तंडे,नानासो पांढरे,कुमार जाधव,धनाजी टकले, दामोदर देवळे,नवनाथ शेंबडे,संदिपान गडदे, राजाराम ढोले, दत्तात्रय ढोले, नामदेव गोडसे,देशपांडे काका,विठ्ठल म्हेत्रे,विलास ढोले,उबाटाचे रघुनाथ ऐवळे विलास काळे,पोपट काळे, सदाशिव बंडगर, सिद्धेश्वर तंडे, नानासो बंडगर, मधुकर घुटुकडे, महादेव घुटुकडे, महादेव ऐवळे, शरद ऐवळे, यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सेवक,आशा वर्कर,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक,बचत गट,सर्व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक संजय खटकाळे, सूत्रसंचालन प्रा.एन.डी.बंडगर, तर आभार प्रदर्शन सोमनाथ अण्णा अनुसे यांनी मानले.
मुख्यमंत्री समृद्ध ‘पंचायत राज’ अभियानांतर्गत
कमलापूर गावामध्ये सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन हे अभियान अत्यंत गतिमान करून सर्व विभागाशी एकरूप होऊन जिल्ह्यामध्ये कमलापूर गावाचे नाव वरच्या स्थानावर नेणार. समृद्ध कमलापूर करण्यासाठी प्रयत्न करणार.
सरपंच सौ.रूपाली सतीश तंडे



