सांगोला
रूपाली काळे यांची आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी निवड

सांगोला (प्रतिनिधी):
बुद्धेहाळ (ता. सांगोला) येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रूपाली संतोष काळे यांची शासनाच्या आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
रूपाली काळे या गावातील दारूबंदी बचत गटाच्या अध्यक्ष असून महिला बचत गटांना संघटित करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या सध्या उमेद अभियानांतर्गत कोळा प्रभागाच्या समन्वयक (C.C) म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत.
त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत शासनाने त्यांची आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. ही नियुक्ती गावातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.