
सांगोला प्रतिनिधी :
महिलेस आईच्या फोनवरून फोन करून घरी बोलावुन, तुझ्या नवऱ्याने पतसंस्थेत फ्रॉड केला आहे, असे म्हणून शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. तसेच जर हा प्रकार कोणास सांगितला तर तुला गावात राहू देणार नाही असे म्हणून महिलेचा पदर ओढून विनयभंग केला असल्याची घटना सोमवार दि.७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील स्टेशन रोडवरील अमर लोखंडे यांच्या घरात घडली आहे.
याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पिडीत महिला ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करते पीडित महिलेचा पती सोमवार दि. ७ रोजी दु. ४ वाजण्याच्या सुमारास घरी आले व आपणा दोघास लोखंडे यांनी स्टेशन रोडवरील घरी बोलावले असल्याचे सांगितले ,पीडित पती -पत्नी स्टेशन रोडवरील घरी गेले असता त्यावेळी घरी अमर लोखंडे , त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी लोखंडे ,आई मीना लोखंडे व नानासो शंकर होनराव आदी उपस्थित होते. त्यावेळी अमर लोखंडे यांनी पीडित महिलेस तुझ्या नवऱ्याने बँकेत फ्रॉड केला आहे, असे म्हटंल्यावर पिडीत महिलेने याच्याशी माझा काहीही संबंध नाही, तुमचे तुम्ही पाहून घ्या असे म्हणाल्यावर अमर लोखंडे याने शिवीगाळ करून महिलेस काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा महिलेचा नवरामध्ये पडल्याने, त्याने काठी हिसकावून घेतली. दरम्यान अमर लोखंडे याने महिलेच्या साडीचा पदर ओढून जवळ ओढून घेतले व दंडास धरून लज्जा वाटेल असे कृत्य केले.
त्यावेळी अमर लोखंडे याची पत्नी राजलक्ष्मी लोखंडे यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत असताना पिडीत महिलेच्या पती मध्ये पडल्याने त्यांनाही अमर लोखंडे यांनी काठीने मारहाण केली, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे तर सदरचा प्रकार कोणास सांगितला तर तुला गावात राहू देणार नाही अशी दमदाटी केली असल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित महिलेने अमर कृष्णात लोखंडे याचे विरुद्ध विनयभंग तसेच त्यांच्या पत्नी विरुद्ध मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.