राजकीय

ते’ फुकट बाबुराव, तर मी तरुणांचा फेव्हरेट ब्रदर – शिंदे

सांगोला प्रतिनिधी :

 

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ फेसबुक लाईव्हवरून म्हणजेच एफ.बी. वरून राज्याचा कारभार चालवला. ते फुकट बाबुराव आहेत, तर मीही एफ.बी. आहे; पण मी राज्यातील तरुणांचा फेव्हरेट ब्रदर आहे, असे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करताना बोलत होते.

 

शिंदे पुढे म्हणाले की, संविधान ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. या संविधानामुळेच एका

सर्वसामान्य घरात जन्म घेतलेला माझ्यासारखा कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. मीच नाही तर अनेकजण आज या संविधानामुळे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही झाले, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री

 

शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आ. बाबासाहेब देशमुख, आ. राजू खरे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह शिवसैनिक आणि भीमसैनिक उपस्थित होते. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात सत्ताधारी महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आम्ही तब्बल ५ कोटी लोकांची कामे केली. सरकार हे रिजन देणारे नाही तर डिसिजन घेणारे सरकार आहे, असे आवर्जून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button