शैक्षणिक

सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम एज्युकेशन फौंडेशनचे व्याख्यान उत्साहात संपन्न

सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम एज्युकेशन फौंडेशनचे व्याख्यान उत्साहात संपन्न

 

संगणक प्रतिनिधी :

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे महाविद्यालयात प्रथम एज्युकेशन फौंडेशन मार्फत विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व प्रथम एज्युकेशन फौंडेशनचे श्री.बापूसाहेब ठोकळे तसेच श्री.किशोर बनसोडे,माजी नगरसेवक सांगोला नगरपरिषद यांनी मार्गदर्शन केले.या व्याख्यानासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, प्रा.एस.एस.काळे, प्रा.एस.पी.जोकार व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रथम एज्युकेशन फौंडेशनची सर्व माहिती व उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती दिली. गरीब होतकरू मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने २५ वर्षांपूर्वी मुंबईत स्थापन झालेली प्रथम ही एक नाविन्यपूर्ण शिक्षण संस्था आहे जी भारतातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करते. प्रथमने भारतातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात वीसपेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लाखो मुलांपर्यंत पोहोचले आहे. कौशल्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील तरुणांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण देणे, त्यांना नोकरी किंवा स्वयंरोजगारासाठी तयार करणे आणि मूलभूत जीवन कौशल्ये तयार करण्यास मदत करणे आहे. २००९ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमात ऑटोमोटिव्ह मेकॅनिक, सौंदर्य आणि कल्याण, आदरातिथ्य, बांधकाम, आरोग्यसेवा नर्सिंग इत्यादी अनेक उद्योग क्षेत्रांचा समावेश झाला आहे. कौशल्य कार्यक्रमांचा भाग म्हणून उद्योजकता समर्थन कार्यक्रम देखील चालवले जातात.या कौशल्य प्रशिक्षणासहित असणाऱ्या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक होऊन राष्ट्रीय विकासामध्ये योगदान द्यावे असे मत व्यक्त करून मनोगताची सांगता केली.तसेच श्री.किशोर बनसोडे यांनी आपल्या मनोगतात युवकांनी व्यवसाय उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रथम सारख्या शिक्षण संस्थेकडून मार्गदर्शन व कौशल्य प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक बनावे असे मत व्यक्त केले.या व्याख्यानास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.या व्याख्यानाचे सुत्रसंचलन प्रा.सौ.आर.के.कदम तर आभार प्रा.एस.पी.जोकार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button