पायोनियर स्कूल य.मंगेवाडी चे सोलापूर जिल्हा सब ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत उत्तुंग यश

पायोनियर स्कूल य.मंगेवाडी चे सोलापूर जिल्हा सब ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत उत्तुंग यश
सांगोला प्रतिनिधी :
खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल, पायोनियर इंग्लिश, सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी शाळेच्या खेळाडूंनी सोलापूर येथे पार पडलेल्या सोलापूर शहर जिल्हा सब ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपला क्रिडा क्षेत्रातील दबदबा कायम राखला आहे.
या स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे.
१) राजवीर दत्तात्रय मासाळ गोळा फेक जिल्हा प्रथम १० वर्षे वयोगट
2) रितेश प्रकाश येलपले गोळा फेक जिल्ह्यात द्वितीय १० वर्षे वयोगट. ३) वनाली पवन विभुते ब्रॉडजंप जिल्ह्यात तृतीय १० वर्ष वयोगट.
४)संकल्प छगन येलपले १२ वर्षे वयोगट गोळाफेक स्पर्धेमध्ये जिल्हा प्रथम.
५)आदित्य दत्तात्रय येलपले १४ वर्षे वयोगट जिल्ह्यात द्वितीय गोळा फेक
६) करण महादेव कोडग गोळा फेक स्पर्धेमध्ये तृतीय जिल्ह्यात १२ वर्षे वयोगट
७) मंथन सुशांत बेंद्रे गोळा फेक स्पर्धेमध्ये जिल्ह्यात चतुर्थ १४ वर्षे वयोगट
८)गणेश विजय गंगधर 300 मी. रनिंग जिल्ह्यात तृतीय १४ वर्षे वयोगट. ९) सुरज विजय येलपले शंभर मीटर रनिंग १० वर्षे वयोगट चौथा आणि ब्रॉडजंप चौथा .
१०) विजय दत्तात्रय घाडगे लांबडे जिल्ह्यात चौथा १२ वर्षे वयोगट
११) श्रवण पांडुरंग शेजाळ लांब उडी १४ वर्षे वयोगट जिल्ह्यात चौथा १२) आयुष संजय पाटील १४ वर्षे वयोगट १००मीटर रनिंग मध्ये जिल्ह्यात चौथा.
१३)आर्यन सुधीर विभुते ५० मीटर रनिंग १० वर्षे वयोगट जिल्ह्यात चौथा.
१४) कार्तिक धीरज पवार १०० मी.रनिंग जिल्ह्यात चौथा क्रमांक
अशा प्रकारे पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रिडाप्रकारात उल्लेखनीय यश मिळवून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
स्पर्धेसाठी खेळाडूसोबत संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल येलपले सर , प्रिन्सिपल श्री.सतीश देवमारे सर , क्रिडा शिक्षक मोहन वाघमारे सर , समाधान येलपले सर , मगर सर , प्राथमिक विभाग प्रमुख राऊत मॅडम , तनुजा मॅडम तसेच माजी सरपंच दत्तात्रय मासाळ , क्रीडाप्रेमी पालक श्री. दत्तात्रय येलपले आणि श्री.छगन येलपले उपस्थित होते.
सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थापक अध्यक्ष श्री अनिल येलपले सर आणि प्रिन्सिपल श्री.सतीश देवमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा शिक्षक मोहन वाघमारे सर तसेच प्राथ.विभाग प्रमुख वैशाली येलपले मॅडम व राऊत मॅडम , माध्यमिक विभाग प्रमुख आशुतोष रूपनर सर आणि बाबर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने पायोनियर स्कूलच्या खेळाडूंनी उत्तुंग यश मिळविले
पायोनियर स्कूल च्या खेळाडूंनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून खेळाडूंचे व शाळेचे कौतुक होत आहे.