जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळुंखेवस्ती बामणी येथे माता पालक मेळावा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळुंखेवस्ती बामणी येथे माता पालक मेळावा उत्साहात संपन्न
सांगोला प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मंगळवार दि.4 फेब्रुवारी रोजी माता पालक व हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ दिपाली कोळसे पाटील मॅडम या उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ दिपाली कोळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सौ.अनिता कांबळे सौ.दिपाली साळुंखे,सौ.राणी उबाळे,सौअर्चना साळुंखे स्नेहल साळुंखे,अश्वीनी साळुंखे,श्रीमती कमल साळुंखे सौ.अश्विनी उबाळे,सुधामती उबाळे सौ.लक्ष्मी बिचुकले व गावातील इतर जेष्ठ महिला कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर कांबळे सर , सहशिक्षिका सौ.वंदना बनसोडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे सौ.दिपाली कोळसे पाटील मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
सहशिक्षिका वंदना बनसोडे मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले यावेळी उपस्थित महिलांशी सौ.दिपाली कोळसे पाटील मॅडमनी संवाद साधला यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे माता पालकांनी कसे लक्ष द्यावे विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा करून घ्यावा शाळा व पालक यांच्यामध्ये संबंध असणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आहे शाळेतील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पालकांनी आवर्जून सहभागी व्हावे असे त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले. तसेच महिलांचे मनोरंजनात्मक खेळ, मनोरा तयार करणे व केसांमध्ये स्ट्रॉ घालणे असे विविध खेळ घेण्यात या खेळा मध्ये प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक काढले. त्यांना विद्यालयाच्या वतीने बक्षीस प्रमुख पाहुण्याच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री दिनकर कांबळे सर व सहशिक्षिका सौ वंदना बनसोडे मॅडम यांनी पुढाकार घेतला.