लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांचा महिम येथे नागरी सत्कार संपन्न

लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांचा महिम येथे नागरी सत्कार संपन्न
सांगोला प्रतिनिधी :
सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांचा महिम ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न झाला…सत्कार समारंभापुर्वी नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते कुदळ मारुन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवा नेते परमेश्वर कोळेकर यांनी केले..तर शंकर चौगुले व भाई दिपक गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी बोलताना सांगीतले की सांगोला विधानसभा मतदार संघातील व मतदार संघाबाहेरील अनेकांनी मदत केली जिवाचे रान केले म्हणुन आज आपला विजय झाला व मी आमदार झालो याची मला जाणीव आहे माझ्या जिवात जिवमान आसेपर्यत मी आपणा सर्वांना आंतर देणार नाही.मला माहीत कित्येकांनी निवडणुक लागण्या आगोदर व निवडणुक काळात आपले व्यवसाय ,काम धंदा बाजुला सारुन तहान -भुक हारपुन निवडणुकीत प्रयत्न केले आहेत त्यांची मला जाणीव आहे..प्रत्येकांनी आपला विजय सुकर व्हावा म्हणुन काम केले आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटते माझे काम झाले पाहीजे अशी आपेक्षा ठेवणे काही गैर नाही परंतु थोडं थांबा…मला वेळ द्या.. जरा दम काढा…अनेकांची कामे होतील समस्या सुटतील असा विश्वास आमदार साहेबांनी दिला.
पुढे बोलताना आमदार साहेब म्हणाले की..स्व.आबासाहेबांच्या काळात आपला तालुका शांततामय तालुका म्हणुन राज्याभर परीचीत होता…तीच शांतता गेले दोन ते तिन महिन्यात पुंन्हा प्रस्थापित करण्यास आपण बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत..तसेच बेकायदेशिर व्यवसायावर आपण लक्ष ठेवुनी आहोत आशा व्यवसायातुन दहशत पसरवणऱ्यांची गय केली जाणार नाही..तसेच भविष्य काळात पाण्याचा प्रश्न मार्गी लावले जातील आपण ही पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.तसेच येणाऱ्या काळात शिक्षण व आरोग्य या कडे मी जातीने लक्ष देणार आहे..एखाद्या वाडी वस्तीवरती मुलगा किंवा मुलगी जर पैशाच्या कारणास्तव शिक्षणापासुन वंचित राहता आसेल तर मला सांगा त्या मुलाची अथवा मुलीची शिक्षणाची जबाबदारी बाबासाहेब देशमुख स्वता: घेईल असे जाहीर केले.तसेच कोणत्याही नागरीकांच्या आरोग्याची किंवा रुग्णांचे एखाद्ये मोठे ऑपरेशन करणे भाग पडत असेल तरी मला कळवा मी त्याची व्यवस्था करेन.विशेषता महिलांच्या आरोग्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिले गेले पाहीजे…
पुढे बोलताना आमदार साहेब म्हणाले की..या गावांमध्ये दुध व्यवसाय खुप मोठा आहे.महिम गावातील दुधाचे संकलन चाळीस हजार लिटरच्या आसपास आहे.आर्थीक उलाढाल मोठी आहे व गावची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास आहे त्यामुळे येथील लोकसंख्या,दुध व्यवसायातुन होणारी अर्थीक उलाढाल याचा विचार करता महिम गावात एखादी बॅक असणे गरजेचे आहे त्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच येणाऱ्या काही दिवसातच पशुवैद्यकीय दवाखान्यास मान्यता मिळवु फक्त गावकऱ्यांनी योग्य ती जागा देण्याचे काम करावे असे सांगीतले शेवटी आमदार साहेबांनी आपला सत्कार केल्याबदल आभार मानुन आपले मनोगत थांबवले ..
सदर कार्यक्रमास सरपंच अर्चना नारनवर,मारुती रुपनर(गुरुजी) वसंत रुपनर,दिगंबर कारंडे,शकुंतला शिरगीरे,स्वाती दिपक रुपनर,आण्णा कोळेकर,आबा कारंडे,बाळासाहेब घोगरे,अंकुश चौगुले,डाॅ.पोपट कारंडे,विष्णु पाटील,दिपक रुपनर,सुरेश नारनवर,शामा पाटील,अनिल घोंगडे,पोपट कारंडे,मोहन रुपनर,सिताराम शिरगीरे,सुरेश महापुरे,बलभिम ऐंवळे,दादासाहेब शेंडे,बसवेश्वर लवटे,दत्ता घोगरे,सुनिल नारनवर,अंबादास लोखंडे,डाॅ.आप्पा नारनवर,सचिन कारंडे व ग्रामसेवक खानसाहेब मुलाणी उपस्थित असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली….