उमाजी नाईक यांच्या बलिदान दिनानिमित्त सोमवारी दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी सांगोल्यात रक्तदान शिबीराचे आयोजन !

उमाजी नाईक यांच्या बलिदान दिनानिमित्त सोमवारी दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी सांगोल्यात रक्तदान शिबीराचे आयोजन
सांगोला प्रतिनिधी ;
जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे व संघटनेचे अध्यक्ष अंकुश जाधव सर यांनी केलेल्या आवाहनानुसार आज दि.३० जानेवारी २०२५ रोजी सांगोला तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेची बैठक,संघटनेचे तालुका अध्यक्ष समाधान उर्फ सुनील मंडले यांच्या अध्यक्षतेखाली, सांगोला शहरातील अंबिकादेवी मंदिरात पार पडली. या बैठकीत आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या १९३ व्या पुण्यतिथी (बलिदान दिन) निमित्ताने सोमवार दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी सांगोला शहरातील वंदे मातरम चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटना म.रा.सचिव उमेश मंडले(सांगोला), संघटनेचे शिक्षण समिती म.रा.सचिव मधुकर चव्हाण सर(यलमर मंगेवाडी),राज्य कार्यकारी सदस्य लक्ष्मण जाधव सर(महुद),संभाजी गुजले (हंगिरगे), सहखजिनदार म.रा.राजेंद्र चव्हाण (हतीद),सोलापूर जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष शहाजी चव्हाण(अजनाळे), जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी चव्हा(अजनाळे), जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन मंडले (एखतपूर), सोलापूर जिल्हा प्रवक्ते दादा मोहीते(कोळा),सांगोला तालुका अध्यक्ष समाधान उर्फ सुनील मंडले (सोनंद),सांगोला तालुका सचिव नामदेव जाधव (महुद),तालुका उपाध्यक्ष नानासो चव्हाण (अचकदानी),तालुका प्रसिद्धी प्रमुख बबन चव्हाण (लोटेवाडी),युवक उपाध्यक्ष लखन मंडले (कमलापूर),भारत जाधव (महूद),संभाजी चव्हाण(सांगोला),बळीराम बोडरे(कमलापूर),यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.