न्यु इंग्लिश स्कूल मध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

सांगोला प्रतिनिधी :
सांगोला शहरातील न्यु इंग्लिश स्कूल मध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्था संचालक डॅा.अशोकराव शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे, पर्यवेक्षक दशरथ जाधव,तात्यासाहेब इमडे,सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम, जेष्ठ शिक्षक औदुंबर कांबळे सर, निलोफर मुजावर मॅडम, कोमल भंडारे मॅडम उपस्थित होते.
यावेळी बोलताना सायली खडतरे मॅडम यांनी गांधींजींच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, भारतीय स्वातंत्रलढ्यातील सर्वात मोठे शस्त्र हे अहिंसा होते. अहिंसेच्या तत्वावर विश्वास असल्याकारणानेच भारतीय जनतेने स्वातंत्रलढ्यात यश मिळवल्याचे त्यांनी नमूद करून विद्यार्थांनी त्यांच्या जीवनात सत्य अहिंसा व प्रेम या त्रिसूत्री वर आयुष्यात यश मिळवून वाटचाल करावी असे अवाहन केले. महात्मा गांधींनी हाच मार्ग अवलंबून इंग्रजांचा सामना करून देश स्वतंत्र केला. गांधीजी अनेक चळवळींचे नेतेही झाले. असहकार आंदोलन, सत्याग्रह, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन, गांधीजींच्या या सर्व आंदोलनांनी भारतातील ब्रिटिश राजवटीचा पाया हादरला. गांधीजी समाजात पसरलेल्या वाईट गोष्टींच्या विरोधात होते. ते व्यसनाधीनता, जातिवाद, विषमता, अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या विरोधात होते. गांधीजींमध्ये लोकांचे नेतृत्व करण्याची अप्रतिम क्षमता होती. त्यांचे विचार दोन पिढ्यांना प्रेरणा देणारे होते. लोक त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आले आणि स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन हजारे सर तर शेवटी आभार प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी मानले.