महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर अंतर्गत सांगोला शहराच्या मलनिःस्सारण प्रकल्प टप्पा क्र.१ योजना राबविणे.

सांगोला प्रतिनिधी :
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत सांगोला शहाराच्या मलनिःस्सारण प्रकल्प योजना राबविणे कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची किंमत रु.१४५,०५,४३,११७/- इतक्या रकमेस मा. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे प्रादेशिक विभाग, पुणे यांनी दिनांक ०७/०८/२०२३ रोजी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. सदर कामाअंतर्गत सांगोला शहराची ३ झोन मध्ये विभागणी केली आहे. त्यानुसार सांगोला शहराच्या मलनिःस्सारण प्रकल्प टप्पा क्र.१ मध्ये वर्कंग सर्व्हे, झोन २ मधील विविध ठिकाणी मलजलवाहिनी अंथरणेकरिता १५० मि.मी. व्यास ते ६०० मि.मी. व्यासाची HDPE DWC SN4 & SN8, RCC पाईपची एकुण लांबी ११७.५४ कि.मी समावेश आहे. ट्रंकमेन, पंपिंग स्टेशन मलशुद्धीकरण केंद्र यांचा समावेश आहे. तसेच २ जेटिंग कम सक्शन मिशनचा समावेश आहे. शहरातील काही प्रभागातून सांडपाणी गोळा करण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार असून उर्वरित प्रभागाकरिता मुख्यवाहिनीद्वारे सांडपाणी एका नाल्यात एकत्र केले जाणार आहे. हा नाला मलशुद्धीकरण केंद्राजवळ अडवून त्या ठिकाणी सांडपाणी ८.५ MLD क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्रामध्ये घेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर कामाच्या टप्पा क्र.२ मध्ये माने वस्ती व भुईटे वस्ती येथे वेटवेल असून उर्वरीत मलजलवाहिन्यांची व्यवस्था करून प्रथम टप्प्यामध्ये निर्माण केलेल्या मलप्रक्रिया व्यवस्थेस जोडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत सांगोला शहाराच्या मलनिःस्सारण प्रकल्प टप्पा क्र.१ योजना राबविणेस रक्कम रु.९६.६३ कोटी इतक्या रक्कमेस शासनाने दिनांक १९/१०/२०२३ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार सदर कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मे. व्हिस्टाकोर इंन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि.पुणे यांना दिनांक
०७/०३/२०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. दिनांक ११/०३/२०२४ रोजीपासून सबंधित ठेकेदार यांनी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली असून त्यापैकी वर्कीग सर्व्हेचे काम पुर्ण केले आहे.
सदर योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी HDPE DWC १५० MM व्यासाची पाईप लाईन ५२६१३ मीटर, HDPE DWC २५० MM व्यासाची पाईपलाईन ११५.५ मीटर तसेच RCC 450 MM व्यासाची पाईप लाईन ४११.५ मीटर टाकण्यात आली आहे. व १९५० Manhole पूर्ण झाले असून ५२ Manhole चे काम सुरू आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी ८०५ Property Chamber पूर्ण झाले असून २३ Property Chamber चे काम सुरू आहे.