सांगोला

आलदर हॉस्पिटलच्या वतीने वाणीचिंचाळे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सांगोला प्रतिनिधी :

डॉ. महावीर महादेव आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणीचिंचाळे येथे मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात २०० रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. महावीर आलदर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या संदर्भात रुग्णांना व त्यांच्या पालकांना आरोग्यांविषयी माहिती दिली.

तसेच यावेळी त्यांनी लहान बालकांना होणारे आजार व घेण्याची काळजी व आलदर हॉस्पिटल मधे नवजातशिशु अतिदक्षता विभाग, लहान बाळासाठी अतिदक्षता विभाग व सर्जरी विभागातील रुग्णांसाठी आलदर हॉस्पिटल हे २४ तास आपल्या सेवेत तयार आहे. गरीब व गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत सध्या योजनेअंतर्गत गरीब व गरजू रुग्णांचा भरपूर फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरात वाणीचिंचाळे परिसरातील अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव उत्तम बाबर, विषयशिक्षक प्रसाद शामराव कुलकर्णी, उपशिक्षक रावसाहेब महादेव लेंडवे,बडोपंत सुकदेव राऊत, बलभिम शामराव कर्वे, संतोष शिवाजीराव यादव, विजया सहदेव जाधव, चंचला तातोबा गडहिरे,फातिमा शिरफोदीन शेख, मुस्कान मणेरी, विजय अवघडे व बहुसंख्य पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button