सांगोल्यात छाप्यात ४० जनावरे, १५०० किलो मांस व वाहने जप्त

सांगोल्यात छाप्यात ४० जनावरे, १५०० किलो मांस व वाहने जप्त
सांगोला (प्रतिनिधी):
सांगोला पोलिसांनी सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) पहाटे मोठी कारवाई करत विनापरवाना जनावराचे मांस, वाहने व जिवंत जनावरे असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे सुमारे ४.२० वाजता सांगोला शहरातील आनंदनगर येथील शाहिद चौधरी यांच्या पत्राशेड येथे करण्यात आली.
कारवाईत ४० जिवंत जनावरे, १५०० किलो मांस, चारचाकी वाहने व विविध साहित्य असा एकूण ८ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल जमीर शेख यांनी फिर्याद दिली आहे.
या अनुषंगाने सांगोला पोलिसांनी गौस रफिक बेपारी (वय ३३, रा. संभाजी चौक, इंदापूर, जि. पुणे) व शाहिद गणी चौधरी (वय २८, रा. भीमनगर, सांगोला) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध मांसव्यवसायावर आळा बसणार असल्याचे मानले जात असून पुढील तपास सांगोला पोलिस करत आहेत.


