लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये दहावी,बारावी निरोप समारंभ संपन्न

लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये दहावी,बारावी निरोप समारंभ संपन्न
सोनंद( प्रतिनिधी)-
लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंदमधील इ. १०वी व १२वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छांचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.
शै. वर्ष २०२४-२५ मध्ये दहावी,बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे नववी व अकरावी विद्यार्थ्यांनी हा शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी संस्था सचिव मा. आनंदराव भोसले,सामाजिक कार्यकर्ते मा. अरविंदभाऊ केदार, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोलाचे संचालक राम बाबर,संस्था सदस्या सौ.रजनी भोसले इ. मान्यवर हजर होते.
दहावीतील तेजस्विनी कोडग, चैत्राली काळे बारावीमधून स्वप्नाली कोडग, गंगामाई खांडेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या शिक्षण संकुलातून आम्हांला शिस्त व संस्काराची जन्मभर पुरेल एवढी शिदोरी मिळाली आहे. येथील शिक्षक- शिक्षिका व संस्थेने आम्हांला स्वतःच्या मुलांप्रमाणे जपले आहे. सर्वच शिक्षकांनी बोर्ड परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे घेतला. आठवड्यातून दोनवेळा घटक वाईज चाचण्यां घेतल्या त्यामुळे आमची परीक्षेची भिती कमी झाली आहे.
प्रमुख पाहुणे मा.अरविंदभाऊ केदार व मा. राम बाबर यांनीही शिक्षण संकुलातील वातावरण स्वच्छता व शिस्त याचे कौतुक करुन या शाळेतील विद्यार्थी निश्चितच जीवनात उंच भरारी घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असे मनोगत व्यक्त केले.
संस्था सचिव मा. आनंदराव भोसले यांनी दहावी, बारावी परीक्षेत तालुक्यात, बोर्डात क्रमांक मिळविल्यास प्रत्येकी ५१ हजाराचे बक्षीस जाहीर करुन गुणवंताना प्रोत्साहीत केले. त्याचबरोबर प्रा. विनायक कोडग, प्राचार्य हेमंत आदलिंगे यांनीही प्रथम क्रमांकाना बक्षीसे जाहीर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष आसबे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सुषमा ढेबे,अमोल केंगार यांनी केले. यावेळी प्राचार्य आदलिंगे यांनी बारावी वर्गासाठी दि. २ मार्चपासून एम. एच.टी. सी.ई. टी. क्रॅश कोर्सचे आयोजन केले असल्याचे सांगून पुणे येथील तज्ञ प्राध्यापक प्रोजेक्टरवर लाईव्ह लेक्चर्स घेणार आहेत. प्रत्येक घटक शिकवून त्याचे शंका निरसनही लगेच केले जाईल. यासाठी ३० विद्यार्थ्यांची एक बॅच असेल. सदरचा क्रॅश कोर्स अल्प फी मध्ये घेतला जाईल. संगणकाची सुसज्ज लॅब यासाठी वापरली जाणार आहे. लातूर, कोल्हापूरप्रमाणे कोर्सचा दर्जा ठेवला जाईल असे सांगितले.
शेवटी मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महांकाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रा. अभिजित पवार, प्रा.आबासाहेब कोळी, प्रा. सौ. वर्षा जाधव, प्रा सतीश कांबळे, प्रा. सत्यवान शेजाळ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.